बलात्कार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तरुणीने केला खून

0

देशात वेगवेगळ्या ठिकाणी गँग रेप, त्यानंतर महिलांचा खून असे प्रकार आजही वारंवार घडत आहेत. यामुळे महिला सुरक्षीत आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तामिळनाडूमध्ये तरूणीने धैर्याने स्वतःचा बचावासाठी वासनेच्या आहारी गेलेल्या नराधाम तरूणाचा खून केला.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी तिरूवल्लूरमधील शोलावरम येथील राहणारी आहे. ती आपल्या चुलतीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री शेतात शौचालयास गेली असता एका अज्ञात तरूणाने तिला अडवले. मद्यधुंद अवस्थेत तिला त्रास देण्यास सुरूवात केली आणि चाकूचा धाक दाखवत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

स्वतःचा बचाव करण्यासाठी तरूणीने तरूणाला धक्का दिला आणि त्याच्या हातातला चाकू खेचून घेत त्याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. चाकूने वार केल्याने तरूण जागीच ठार झाला.

या घटनेनंतर तरूणी थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली असता पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही या घटनेसंदर्भात अटक करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.