घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या तपास पथकाने एका तरुणाला घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणीअटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हि कारवाई पोलिसांनी भोसरी पोलीसठाणे हद्दीत केली.

परमेश्वर दयानंद माने (26, रा.भोसरी, मुळ देवणी लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला भोसरी परिसरात एकजण नागरिकांच्या जिवितीला धोका निर्माण करत घरगुती गॅसचाकाळाबाजार करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी  भोसरी येथील भगवतवस्ती मधील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेसदुकानातून आरोपीला ताब्यात घेतले.

दुकानाची तपासणी केली असता मोठ्या गॅसच्या टाकीतील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून त्यांची विक्री करत होता. आरोपीकडूनपोलिसांनी 10 घरगुती गॅसच्या टाक्या 28 लहान टाक्या असा एकूण 38 गॅस टाक्या, 2 गॅस, विड्रॉल मशीन, एक वजन काटा एकूण48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपासपोलीस करत आहेत.

हि कारावाई गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोदहिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.