‘आप’तर्फे आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली

0

पुणे : केंद्र सरकारने असंसदीय मार्गाने पास केलेल्या ३ काळ्या कृषी कायद्यांना शांततापूर्ण मार्गाने विरोध करणाऱ्या जवळपास ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हौतात्म्यास आप तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

२६ नोव्हेंबर २०२० रोजी पासून सुरु झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास आम आदमी पार्टीने सक्रिय पाठिंबा व सहभाग नोंदवला आहे. ७० कोटी शेतकऱ्यांना ह्या कायद्याची झळ पोहोचणार आहे.परवा दिल्ली विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री मा अरविंद केजरीवाल यांनी या तीनही कायद्यांचा निषेध करून व या कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पार केला त्याबद्दल दिल्ली विधानसभेचे वक्त्यांनी अभिनंदन केले.

पुण्यात आज सायंकाळी अलका टॉकीज , सेनापती बापट पुतळ्याजवळ लॉक डाउन च्या सर्व नियमांचे पालन करत व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करत श्रद्धांजली कार्यक्रम झाला. त्यात आपचे आकाश मुनियन, सतीश यादव,सईद अली, मोहनसिंग रजपूत,विक्रम गायकवाड, रवी आदरकर, आनंद अंकुश, सुहास पवार, शान पाशा, किशोर मुजुमदार, अभिजित मोरे, धनंजय शिंदे,  मुकुंद किर्दत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.