आता महाविकास आघाडीला महापालिकांच्या निवडणुकांचे वेध 

0

मुंबई ः पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या दमदार यशानंतर आणि १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर राज्यातील १०० नगरपालिका आणि ५ महानगरपालिका यांच्या निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना चांगले यश मिळाले, त्यामुळें राज्यातील राजकीय परिस्थिती तिन्ही पक्षांना अनुकूल असल्याचे दिसत आहे. महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका शक्य तेवढ्या लवकर घेण्याचा प्रयत्न सरकारचा असेल, असे राजकीय विश्लेषकांकडून मांडले जात आहे.

पाच महानगगरपालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिलवलीचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले की,”पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधी संपला आहे. जवळपास १०० नगरपंचायती आणि नगरपालिका एकतर कार्यकाळ संपला आणि किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रिपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे आणि ती कायम राहील.”

Leave A Reply

Your email address will not be published.