अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट

0

मुंबई : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात राजा का बेटा राजा ही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

एकही टीकेची संधी न सोडणारे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी सुपर 30 या हिंदी चित्रपटातील डायलॉग म्हणून टोला लगावला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा’ याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हिंदुत्व, मराठी माणसाची, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरेच पुढे नेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर कुणाचीही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवालच देशपांडे यांनी केला आहे. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनवर आलेल्या या वेळेचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना जात, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.

केमिकल लोचा कोणाचा झालाय हे स्पष्ट होतंय. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी काय काय काम केली याची आता केंद्र चौकशी करणार आहे. त्यात काही गैर असेल तर चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही देशपांडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.