लसूण भारताच्या प्रत्येक स्वयंपाक घरातील महत्वाची वस्तू आहे. आपलं जेवण टेस्टी करण्याचं काम लसूण करते. परंतु तुम्हाला माहीत आहे का… लसून उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आपण लसणाच्या चहापासून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करू या. रिकाम्या पोटी सकाळी एका पाण्याच्या ग्लासमध्ये लसणाचा वापर करून प्यायलो तर, आरोग्याच्या अनेक तक्रारी पळून जातात.
१) रिकाम्या पोटी लसणाचा चहा प्यायल्याने मेटाबाॅलिज्म वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली पचनक्षमता दुपटीने वाढते.
२) लसणाच्या चहाने हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि हृदयाच्या अनेक व्याधी कमी होतात. त्याचबरोबर रक्ताभिसरणाला प्रोत्साहन देते.
३) आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर काढण्यास लसणाचा चहा खूप महत्त्वाची मदत करतो. तसेच पित्ताचा त्रासही कमी होतो.
४) सर्वात महत्वाचे… वजन कमी करण्यास लसणाचा चहा अत्यंत महत्वाचा आहे. कारण, भूखेला थांबवून ठेवण्याची शक्ती लसणाच्या चहात आहे आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यात लसणाचा चहा मदत करतो.
५) लसणाचा चहा कोलेस्ट्रेराॅल असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि डाॅक्टरही तो सल्ला देतात. तसेच कोलेस्ट्रेराॅलसंबंधित विकार कमी करण्यास मदत करते.
हा लसणाचा चहा कसा तयार करायचा, हा प्रश्न पडला असेल? तर, सोप्पं आहे. तीन कप पाणी घेऊन त्याला उकळवा. त्यात ३-४ लसणाच्या फोडी कापून टाका. काही मिनिटांपर्यंक उकळू द्या. त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. त्याचबरोबर आलेदेखील टाका. झाला तुमचा लसणाचा चहा. हा चहा तुम्ही दिवसभर वापरू शकता.