मुंबई ः बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या ट्विटरवर ट्रोल होताना दिसत आहे. डिस्ट्रिब्यूटर अक्षर राठीने अभिनेता अक्षक कुमारचे कौतुक करताना ट्विट केलं आहे की, ”हैराण करणारी एक आहे की, अक्षय कुमार जित्या वेळात एक अख्खा सिनेमा करतो, तितक्या वेळात बाकी कलाकर एक लहानसा सीन करतात. असे असूनही अक्षय कुमारचे चित्रपट हीट होतात. माझ्या मते, बहुतांश कलाकरांनी हे शिकण्याची आणि त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.”
यावर अभिषेक बच्चनने म्हणाला की, ”माझ्या मत हे योग्य नाही. प्रत्येक जण वेगळा असतो. वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते. प्रत्येकाची काम करण्याची गती वेगळी असते”, अशी काॅमेंट अभिषेकने केली. त्यावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले.
भावा, कोणा चांगले काम करत असेल तर त्याचे कौतुक व्हायला हवे. मला माहितीय की, तू स्लो आहेस म्हणून तुला वाईट वाटत आहे, अशी काॅमेंट देऊन अभिषेकला एका युजर्सने ट्रोल केले. त्यावर अभिषेक म्हणाला की, मी महामारीच्या काळाच एक वेबसिरीज, एक डाॅक्युमेंटरी आणि ३ चित्रपट पूर्ण केले आहेत. त्याचे प्रमोशनही केले. माझ्या मते माझ्या स्पीडचा प्राॅब्लेम आहे, अस वाटत नाही. आणखी एका युजर्स ट्रोल करताना म्हणाला आहे की, अभिषेक स्वतः नेपोटिझमचा प्राॅडक्स आहे आणि अक्षयला जज करतो आहे. त्यावर अभिषेक म्हणाला की, कोणी जज करत नाही, भावा. अक्की भैय्याचं काम कौतुकास्पदच आहे.