पुण्याच्या येरवड्यातील दुर्घटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

0

पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर 8 मध्ये एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान, PM नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Pained by the mishap at an under-construction building in Pune. Condolences to the bereaved families. I hope that all those injured in this mishap recover at the earliest: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) February 4, 2022

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर 8 येथील एका नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधणीचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री 11 वाजता हा सांगाडा अचानकपणे कोसळला. त्या सांगाड्या खाली काही कामगार काम करत होते. सांगाडा कोसळल्याने सर्व कामगार त्या खाली दबले गेले.

5 people have been reported dead and 2 critically injured. The construction work of a mall was being done here when a heavy steel structure collapsed. All laborers belong to Bihar. The reason for the collapse is under investigation: Rohidas Pawar, DCP Pune Police pic.twitter.com/IC4Cokms1a

— ANI (@ANI) February 3, 2022

त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. तात्काळ अग्निशामक दलाला ही माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या 6 गाड्या, 108 च्या रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की, त्या खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर केला. तो सांगाडा कापून कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 कामगारांना  ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिकांनी संबंधीतावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.