पिंपरी : ट्रक आणि कंटेनरचा अपघात झाल्याने पुणे- मुबंई एक्सप्रेसवर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. 21) सकाळी खंडाळ्याजवळ ही घटना घडली.
अपघातानंतर क्रेनच्या साहय्याने कंटेनर बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र तो बाजूला करता आला नाही. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार असल्याने द्रुतगती महामार्गावर आज मोठी गर्दी होती. त्यातच सकाळी सातच्या सुमारास मोठा अपघात झाला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच पडून असल्याने वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत.
या रांगा जवळपास पाच किलोमीटरपर्यंत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दुसऱ्या लेनमधून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला. वाहतूक सुरळीत करण्यास खूप वेळा गेला.