गजानन चिंचवडे यांचे आकस्मिक निधन

0

पिंपरी : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि भाजपमध्ये गेलेले गजानन चिंचवडे (52) यांचे आज (शनिवारी) आकस्मिक निधन झाले. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे ते पती होते.

मित्राच्या सदनिकेवर गेले होते. तिथे बाथरूममध्ये पडल्यालर वाढले त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

गजाजन चिंचवडे पूर्वी काँग्रेस मध्ये होते. काँग्रेसकडून पूर्व पीसीएमटीचे ते पाच वर्षे सदस्य होते. महापालिका शिक्षण मंडळावरही ते पाच वर्षे सदस्य होते. शिवसेनेचे मावळ जिल्हाप्रमुखम्हणून त्यांनी काम केले. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू सहकारी अशी गजाजन चिंचवडे यांची ओळख होती.

काही महिन्यांपूर्वी चिंचवडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे शिवसेनेकडून सलग दोनवेळा नगरसेविका आहेत. संघवी केजरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्थापनेत मोठा वाटा होता. 

Leave A Reply

Your email address will not be published.