प्रेमीकेचा खून करुन दहा वर्षे फरार असणारा आरोपी गजाआड

वाकड पोलिसांची कामगिरी

0

पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून घरातून नेलेल्या गर्भवती प्रेमीकेचा खून करुन दहा वर्षे फरार असणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तपास पथकाला 50 हजाराचे बक्षिस जाहिर केले आहे.

किशोर लक्ष्मण घारे ( रा. डोणे ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर चांदणी सत्यवान लांडगे (22 वर्ष रा. बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी, पुणे) असे खुन झालेल्या प्रेमीकाचे नाव आहे. या प्रकरणी मुलीची आई सविता सत्यवान लांडगे (45 वर्ष रा. बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी, पुणे ) यांनी मिसिंग तक्रार दाखल केली होती.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वी (2011) रोजी एका महिलेने तिची मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानूसार पिंपरी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. तर 2014 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक युवक राहत्या घरातुन निघुन गेला असल्याची मिसिंग तक्रार दाखल झाली होती.
या दोन्ही मिसिंग तक्रारीचा तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील हे करीत होते. या तक्रारीबाबत माहिती काढत असताना गोपणीय माहितीदाराकडुन माहिती मिळाली की, वडगाव मावळ भागातुन मिसिंग झालेला युवक किशोर घारे हा म्हारुंजी गावात भाजीविक्री चा व्यवसाय करीत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचुन आरोपी किशोर घारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्याची प्रेमिका चांदणी लांडगे हिच्या विषयी चौकशी केली असता सुरवातीला तो उडलाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. पोलीसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने आपल्या प्रेमिकेचा दहा वर्षापूर्वा खुन केला असल्याची माहिती दिली. दोघांच्या प्रेमसंबंधातुन झालेली गर्भधारणा आणि प्रेमिका चांदणी हिने लग्नासाठी लावलेला तगादा या कारणावरुन तिचा खुन केला असल्याचे आरोपी किशोर घारे याने कबुल केले आहे.

हिंजवडीतील एका कंपनीत आरोपी किशोर आणि मृत चांदणी हे सोबत काम करीत होते. यामुळे दोघांचे प्रेमसंबंध जुळुन आले. दोघांचे प्रेम प्रकरण असल्याची कुणकूण मुलीच्या आईला लागली होती. ते दोघे लग्न करतील असे तिला वाटत होते. आम्ही लग्न करतो असे सांगुन आरोपी किशोर हा मृत चांदणी ला मुंबईला घेऊन गेला.

2011 मध्ये त्याने चांदणीचा खुन केला तरी देखील आरोपी किशोर हा मृत चांदणीच्या आईच्या संपर्कात होता. खुन करुन त्याने चांदणीचा मृतदेह एका जंगलात टाकुन दिला. त्यावेळी चांदणी गर्भवती होती. सन 2014 मध्ये आरोपी किशोर घरातुन निघुन गेला असल्याने त्याच्या कुटूंबीयांनी वडगाव मावळ येथे त्याची मिसिंग तक्रार दाखल केली. गेली दहा वर्ष तो स्वतःची ओळख दडवुन तो खुन पचविण्याचा प्रयत्न करीत होता.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक एस.एम.पाटील, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, पोलीस हवालदार बापुसाहेब धुमाळ, दिपक भोसले, पोलीस नाईक विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, आतिश जाधव, पोलीस शिपाई नितिन गेंगजे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.