अनेकांना गंडा घालून दोन वर्षे मोकाट फिरणारा ‘मोफा’तील आरोपी अटकेत

0

पिंपरी : द व्हिलेज रेसिडेन्सी, नेरेगाव येथील प्रकल्पात ‘फ्लॅट’ न देता सुमारे चार कोटी 14 लाख 27 हजार 491 रुपयांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन वर्षे मोकाट फिरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

प्रतीक ओकप्रकाश अगरवाल (रा. बाणेर) याला अटक केली आहे. याप्रकरणी मनमीदरसिंग तिर्थसिंग आनंद (55, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रतीक, किरण कुंभारकर (रा. हिंजवडी) आणि विनय बोरीकर (हिंजवडी) हे भागीदार होते.

नेरेगाव येथे द व्हिलेज रेसिडेन्सी येथे अगरवाल आणि त्यांच्या भागीदारांनी गृहप्रकल्प केला. यामध्ये सदनिका साठी 34 जणांकडून पैसे घेतले. मात्र त्यांना सदनिका न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 2020 मध्ये फसवणूक, अपहार आणि मोफा नुसार गुन्हा दाखल झाला.

आरोपी प्रतीक याचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला असताना तो मोकाट फिरत होता. याबाबत माहिती मिळवली असता तो रांची, झारखंड येथे असल्याचे समजले. पोलीसानी तपास करत त्याचा माग काढला. तो रेल्वेने प्रवास करत असताना गुंडा विरोधी पथकाने त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरिष माने, हजरत पठाण, प्रवीण तापकीर, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सोपान ठोकळ, गणेश मेदगे, सुनील चौधर, मयुर दळवी, शाम बाबा, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, राम मोहिते, गिरी, शेख, खंडणी विरोधी पथकाचे सुनील कानगुडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.