संतोष अंगरख याचा खून झाला होता. संदीप ऊर्फ चुंगरु लालजी कुमार (२१, पत्ता- मु . जनी, पो. रामापुर, ता. ज्ञानपुर, जि. भदोही उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे.
व्यवसायातील आर्थिक वादातुन आरोपी गणेश सुभेदार पवार व त्याचे साथीदारांनी १६ ऑगस्ट २०२० रोजी रहाटणी, काळेवाडी येथुन संतोष अंगरख यास उचलुन नेवुन त्याचा कासारसाई येथे खून केला. त्याची बॉडी तेथेच पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
फरार आरोपींचा शोध घेत असताना त्यांचेबाबत तांत्रिक व इतर माहीती घेतली असता ते उत्तर प्रदेश येथे पळुन गेले असल्याबाबतची माहीती मिळाली. त्यानुसार उत्तरप्रदेश येथुन मोठया शिताफीने गुन्हयातील फरार आरोपीला अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरिष माने, पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे, शाम बाबा व तपास पथकाचे अंमलदार यांनी केली .