‘मोक्का’मध्ये पाहिजे आरोपींना अटक, पिस्तूलासह हत्यारे जप्त

गुंडा विरोधी पथकाची कारवाई

0

पिंपरी : गंभीर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली असताना फरार असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांकडून 1 बनावट पिस्तुल, काडतुसे आणि दोन कोयते अशी हत्यारे जप्त केली आहेत.

हेदर जावेद सय्यद (28, रा. काशीदनगर, पिंपळे गुरव, सांगवी), दिपक भीमराव सगर (21, रा.कोकणेनगर, काळेवाडी) आणि प्रथमेश उर्फ सोन्या यशवंत सावंत (20, रा. कोकणेनगर, काळेवाडी) या तिघांना अटक केली आहे; ही माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोक्काच्या गुन्हात फरार असलेले आरोपी पवनाघाट स्मशान भूमीजवळ बसले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवर, रामदास मोहिते आणि शुभम कदम यांनी सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी यांच्याकडून एक बनावट पिस्तुल आणि दोन कोयते जप्त केले आहेत. यातील सय्यद याच्यावर 5, सावंत याच्यावर 3 आणि सगर याच्यावर 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

गुंडा विरोधी पथकाच्या स्थापनेच्या अवघ्या एक महिन्याय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियन सन 1999 (मोक्यासारख्या ) गंभीर गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेल्या एकूण 09 गुंडाचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात पथकास यश आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.