अवैधरित्या दारू विक्री सुरु असलेल्या हॉटेलवर कारवाई

0

पिंपरी : सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारूची विक्री चालू असलेल्या हॉटेल मालकावर कारवाई केली आहे.

आयुक्तालयच्या हद्दीमध्ये अवैध धंदयास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , चाकण–शिक्रापूर रोडवर इण्डेन बॉटलींग प्लांट समोर , साई मुद्रा व्हेज नॉनव्हेज नावाचे हॉटेल असून हॉटेलचा मालक नामे ) निलेश बाळासाहेब पानसरे रा . डॉ.बाबासाहेब अंबेडकर नगर , चाकण पुणे हा हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी – विदेशी दारू तसेच बियरची विक्री करत आहे .

तेव्हा सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण शिक्रापूर रोडवर जाऊन इण्डेन बॉटलींग प्लांट येथे थांबून एक बनावट गिन्हाईक पाठवून बातमीप्रमाणे खात्री केली असता पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी दिनांक- ०१/१२/२०२० रोजी शिक्षक व पदवीधर मतदार संघ पुणे विभाग निवडणूक २०१० असल्याने निवडणूक परदर्शक तसेच शांततेच्या निर्भय व निःपक्षपाती वातावरणात व्हावी ,

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४८ तास अगोदर ड्राय डे घोषीत केला होता व देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याचे खात्री होताचा साई मुद्रा हॉटेलवर छापा टाकला असता घटनास्थळावर ४० हजार ९३१ रू किं.चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करित आहे .

सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , पोउनि धैर्यशिल सोळंके , सपोफी विजय कांबळे , पोहवा सुनिल शिरसाट , पोना भगवंता मुठे , पोना अनिल महाजन , पोना अमोल शिंदे , पोना नितीन लोंढे , पोशि मारुती करचुंडे , पोशि राजेश कोकाटे , पो.शि. योगेश तिडके यांनी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.