पिंपरी : दरोडा, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वाकड परिसरातील गुन्हेगार शुभम कवठेकर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख शुभम कवठेकरसह इतर सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी टोळीप्रमुख शुभम निवृत्ती कवठेकर (23, बिबवेवाडी, पुणे), दिपक नाथा मिसाळ (23, रा. काळेवाडी, पुणे), आकाश महादेव कांबळे ( 22, रा. रहाटणी पुणे), कैलास हरिभाऊ वंजारी (19, रा. रहाटणी पुणे), मंगेश मोतीराम सपकाळ (23, रा. काळेवाडी, पुणे), सनी गौतम गवारे (19, गजानन नगर सी. कॉलनी, रहाटणी), यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम निवृत्ती कवठेकर आणि इतर आरोपी हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे दरोडा टाकणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी घेणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.