पिंपरी : सध्या आयपीएल टी-20 चे सामने सुरु असून या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी(दि.12) राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघामध्ये सामना झाला. या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एकाला पिंपरीपोलिसांनी अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ही कारवाई पिंपरी मार्केट परिसरातबुधवारी करण्यात आली.
रोशन जितेंद्र मायारामानी (27 रा. कान्हा विहार बिल्डिंग, साई चौक, पिंपरी) याला अटक केली आहे. तर सनि आणि आशु हे दोघेफरार झाले आहेत. आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, इंडियन टेलिग्राफ अॅक्ट नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी यांनी फिर्याद दिली आहे.
राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतली जात असल्याची माहिती पोलीस अंमलदाररेड्डी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपरी मार्केट परीसरात बेटींग घेणाऱ्याचा शोध घेत असताना आरोपी रोशन मायारामानी यालाताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो त्याचा मोबाईल फोनवर चालु क्रिकेट सामन्यादरम्यान ग्राहकांना फोन करुनत्याच्या फोनमध्ये असलेल्या ‘क्रिकेट माझा 11’ या अॅपवरुन बेटींगचे भाव ग्राहकांना सांगत होता.
तसेच ग्राहकांनी बेटींग लावल्यावर ते पुढे त्याचा मालक सनी सुखेजा आणि आशु आसवानी यांना कळवत होता.
सनी सुखेजा आणि आशु हे दोघे ग्राहकांच्या रक्कमेतून बेटिंग लावत असल्याची माहिती आरोपीने दिली. त्यानुसार पोलिसांनीसुखेजा आणि आसवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपासपोलीस उप–निरीक्षक अनिरुद्ध सावर्डे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ1 पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस अंमलदार भांडवलकर, बारशिंगे, हांडे, करपे, बागसिराज, भारती, महाडिक, शेख, जानराव, रेड्डी यांच्या पथकाने केली.