पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भष्ट्राचार थांबवून कारवाई करावी

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सन २०१७ पासून स्थापत्य, पाणी पुरवठा जलनिस्सारण इत्यादी विभागामार्फत विविध विकास कामांसदर्भात निविदा काढल्या जातात त्यामध्ये बहुतांश वेळा ठेकेदार व अधिकारी मिळून रिंग करुन ठराविक ठेकेदारांनाच निविदा मिळतील अशा प्रकारे निविदा अटी शर्ती ठेवतात. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.

मार्च २०२० पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला त्याला प्रतिबंध करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाय योजना युध्दस्तरावर चालू केल्या. यामध्ये मास्क सँनिटाझर इत्यादीच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. त्याच प्रमाणे मनपामार्फत शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचा घाट आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गांच्या प्रतिबंधासाठी सी.एस. आर. अंतर्गंत विविध खाजगी कंपन्यांनीही मनपास मदत केली. परंतु त्यांनी किती मदत केली, कश्या स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही. कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खाजगी कोविड सेंटरने जर बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत. तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरसा बिले अदा केली आहेत त्या तपशील द्यावा.

मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे याची कारणे सविस्तरपणे देण्यात यावी; तसेच यावर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर, करण कोकणे, विशाल वाकडकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.