डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक करण्यात आली. भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली आहे.
यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. रवींद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या आहेत. तर निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार फसवणूक व चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे
रविंद्र महादेव माशाळकर (34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (34, मुंबई), मूकेश हरिश्चंद्र मोरे (37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (42, औरंगाबाद), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) व अनघा अनील मोडक (40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.