अभिनेता शिवम पाटील ला होतोय ‘त्या’ गोष्टींचा त्रास

0

मुंबई : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमधून नावारुपास आलेला मराठमोळा अभिनेता शिवम पाटील सध्या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वर्षांपूर्वी अय्यारी या चित्रपटातून शिवमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. तरी देखील समिक्षकांना त्याची भूमिका आवाडली होती. त्यामुळे आता त्याला एक चांगली आणि मोठी भूमिका मिळेल अशी आशा होती.

अभिनेत्री मेधा शंकरन आणि इतर दोन महिलांनी केलेल्या आरोपानंतर त्याला काम मिळेनास झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवम नैराश्येचा सामना करत होता. आता शिवमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मेधाने केलेल्या या सगळ्या आरोपांवर उत्तर देत त्याच्या सोबत घडलेल्या या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

शिवमने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नैराश्येचा खुलासा केला आहे. मेधा सतत माझा अपमान करायची. मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. माझ्यावर विनोद करायची. तिने अनेकदा माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले आहे. ज्या गोष्टींशी माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिने माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. पण मी तिच्या बाबत कोणालाही काही सांगू शकतं नव्हतो. कारण मला माझं करिअर संपण्याची भीती वाटत होती. किंबहुना ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती,” असे शिवम म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.