अभिनेता सोनू सूदचा शेतकऱ्यांना पाठिंबा 

0

मुंबई ः कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणा-उत्तरप्रदेशीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता बाॅलिवूडमधील गायक, अभिनेत्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेसा सोनू सूदनेदेखील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

https://twitter.com/SonuSood/status/1334459687421534209?s=20

शेतकऱ्यांना पाठिंबा देताना सोनू सूदने आपल्या ट्विटरवरून फक्त ‘किसान है हिंदूस्तान’ असे लिहिले आहे. त्याचे हे ट्विट अतिवेगाने व्हायरल होत आहेत. आतापर्यंत १४ लाख लोकांनी सोनूचे ट्विट लाईक केलेले आहे. तर, १७ हजारांहून जास्त लोकांनी त्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सोनू सूद हा बाॅलिवुडमध्ये जरी खलनायकी भूमिका साकारत असला तरी, प्रत्यक्ष जिवनात तो अनेक जणांचा दाता आहे. लाॅकडाऊनच्या काळात लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी करोड रुपयांची मदत करून प्रवाशाची व्यवस्था लावून दिली होती. तसेच त्याच्याकडे मदतीसाठी अनेक जण सोशल मीडियामधून विनंती करत असतात, तो त्यांची त्वरीत मदत करतो. त्यामुळे तो दानशूर सेलेब्रिटीजच्या यादीत अव्वल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.