“शांत राहणं हेच सर्वोत्तम उत्तर”

अभिनेत्री अंकिता लोखंडेचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

0

मुंबई ः अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीचे व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. पण, हे व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले. सुशांतच्या मृत्यूचं दु:ख तुला नाही का, असा प्रश्न उपस्थित करत तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं. यावर अंकिता बोलली आहे की, “काही प्रश्नांची उत्तर केवळ शांत राहून दिली जातात. शांत राहणं हे सर्वोत्तम उत्तर आहे”, अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून अंकितानं ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे.

अंकिताच्या बर्थ डेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये सुशांतच्या चाहत्यांना ही बाब खटकली होती. कारण, सुशांच्या मृत्यूला काही दिवसच झाले आहेत आणि अंकिताने आपला बर्थ-डे धुमधडाक्यात साजरा केला. त्यात संदीप सिंगही पार्टीत दिसला, त्यामुळे सुशांतचे चाहते प्रचंड चिडले आणि अंकिता ट्रोल केले होते.त्याला अंकिता मुहतोड जवाब दिला आहे.

मालिकांमध्ये काम करताना अंकिता, सुशांत आणि संदीप हे तिघे  जण एकत्र राहत होते. त्यानंतर मात्र सुशांत आणि संदीप यांच्या जास्त संपर्क होत नव्हता. संदीप आणि सुशांत या दोघांचे १ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटचं बोलले होते. असं असलं तरी सुशांतच्या मृत्यूनंतर सर्व गोष्टींमध्ये संदीपनेच पुढाकार घेतलेला दिसला. दरम्यान, संदीपचा एक व्हिडिओही समोर आला होता. यात तो सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिसांना आणि रुग्णवाहिकेली थम्स-अप करताना दिसत होता., त्यामुळे ट्रोलर्स संदीप सिंगवर खूप चिडून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.