अभिनेत्री दिव्या भटनागरचे करोनाने निधन

0

मुंबई ः ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं करोनाने निधन झालं. दिव्यावा करोनाचे संक्रमण झाले असे समजल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीत तिची तब्येत आणखी बिघडल्यामुळे आणि श्वास घेण्यास अडथळा येत असल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दिव्याची प्रकृती काळजी करण्यासारखी असल्याचे सांगण्यात आले होते. तिची ऑक्सीजन पातळी कमी होत असल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शेवटी तिची जगण्याची झुंज आज संपली. तिने अवघ्या ३४ वर्षांच्या वयात जगाचा निरोप घेतला आहे.

दिव्याची मैत्रिण अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून दुखः व्यक्त केले आहे. देवोलीना म्हणते की, ”जेव्हा कोणी बरोबर नसायचे तेव्हा तू असायचीस. तू माझी मैत्रिण होतीस जिला मी ओरडू शकत होते. मी तुला मिस करेन दिवू. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तू खूप लवकर निघून गेली.”, असा मॅसेज करून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.