अभिनेत्री जयश्री रामय्या हिची आत्महत्या

0

बंगळुरू :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या नंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. कन्नड Bigg Boss मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जयश्री रामय्या हिने आत्महत्या केली आहे.

जयश्री रामय्या हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं. त्यावर अनेक जण तिच्यापर्यंत पोहोचले. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही.

कन्नड Bigg Boss च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्याबरोबरच्या अनेक स्पर्धकांना या रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्या बाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं. त्याबद्दल तिने तिच्या मित्रमंडळींंना सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.