अभिनेत्री नोरा फतेहीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. नोरा फतेही आपल्या नृत्याबरोबरच अभिनयासाठी ही ओळखली जाते. नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री नोरा खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही गुलाबी बॉडीकन ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत २१ लाखहून अधिक चाहत्यांकडून पाहिले गेले आहे.

https://www.instagram.com/p/CJkz-B2pspw/?utm_source=ig_web_copy_link

नोरा फतेहीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिच्या स्टाईलचे चाहतेही कौतुक करीत आहेत. नोरा फतेहीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘नच मेरी रानी’ हे गाणे प्रसिद्ध केले होते. जे सोशल मीडियावर चांगलेच गाजले.

नोरा फतेही आणि गुरु रंधावा यांचे हे गाणे आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त पाहिले गेले आहे. नोरा फतेही लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाशी संबंधित नोरा फतेहीची एक क्लिपही व्हायरल झाली असून, तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

Leave A Reply

Your email address will not be published.