मुंबई ः अभिनेत्री ऋता दुर्गळे हे मालिकांमधील प्रसिद्ध नाव आहे. आपल्या विविध भूमिकांमधून दमादार अभिनयातून आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. इतर काही अभिनेत्रीसारखी ऋता सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. सध्या ऋता एक फोटो बराच व्हायरल होत आहे.
ऋताने सेटवरचा एक फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यामध्ये ऋताने काळा गाॅगल घालून निवांत मूडमध्ये ती दिसत आहे. ऋताच्या या फोटोवर इतर चाहत्यांसह मराठी कलाकारांनीदेखील काॅमेंट्स केली आहे. यामध्ये सुव्रत जोशीच्या काॅमेंटने सर्वांचं लक्ष वेधलंय.
सुव्रत म्हणतो की. बरंय तुमचं हं. भारी जागांवर तुम्ही शूट करता तुम्ही. ऋता आगामी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. यात ती आदिती नावाची भूमिका साकारणार आहे. असे असले तरी, या वेब सिरीजचे नाव कोणालाही कळलेलं नाही. मात्र, ऋताने आपल्या चाहत्यांची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. ऋता ही एका सिंगिंग स्टार या रिएलिटी शोमधून सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून दिली होती. काही नाटकं तिनं केली आहेत.