गणेश कस्पटे यांच्या संकल्पनेतुन ‘आदर्श सोसायटी स्पर्धा’

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस येत्या १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे युवा मंचच्या संकल्पनेतून आदर्श सोसायटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 39 पिंपळे निळख, विशालनगर, कस्पटे वस्ती परिसरातील सोसायटी या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

यामध्ये दोन गट करण्यात आलेले असून पहिला गट 40 सदनिका प्रयत्न आणि दुसरा गट 40 सदनिकांच्या पुढे असणार आहे. यामध्ये पाच क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या गटास प्रथम क्रमांकाला 31 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 25 हजार आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास 15 हजार आणि सन्मानचिन्ह आणि पाचव्या क्रमांकाला 11 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

दुसऱ्या गटातील पहिल्या क्रमांकाला 51 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 45 हजार आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास 31 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास 21 हजार आणि सन्मानचिन्ह आणि पाचव्या क्रमांकाला 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सोसायटीने 14 फेब्रुवारी प्रयत्न गणेश कस्पटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.