पुणे : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सीबीआयने ने ताब्यात घेतलेआहे.
अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असे अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पुण्याच्या महसूल विभागात मोठीखळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत व्यवहार करण्यात येत होता. यावेळी रामोड यांना ८ लाख रुपयेस्वीकारताना सीबीआयने पकडले.
सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.