मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहे. त्यावर ‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’ असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही भाजपविरोधात संघर्षाचे संकेत दिले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप केला. काही दिवसांपूर्वीच प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊत यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेची मोठी घोषणा केली आहे.
या पत्रकार परिषदेबद्दल शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली. ‘आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंग काय करायची ते पाहू’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.