‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करावी : चेतन बेंद्रे

0

पिंपरी : २०२४ फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला; तरीही अद्याप शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरटीईप्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाहीये.

आम आदमी पार्टी चे चेतन बेंद्रे यांनी राज्य शासनाला मेल द्वारेआरटीईप्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मागणी केली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार, सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमाच्या शाळांमधीलआरटीईच्या २५टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षीआरटीईप्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विलंबहोतो.

दरवर्षी ही प्रक्रिया जानेवारी महिन्या मध्ये सुरु होऊन  डिसेंबर महिन्या पर्यंत चालते. शाळेत उशीरा प्रवेश भेटल्यामुळे बालकांचाअभ्यासक्रम मागे राहतो आणि त्यांचे नुकसान होते.  

२०२४ चा फेब्रुवारी महिन्या सुरु होऊन देखील सन २०२४२५ या शैक्षणिक वर्षा साठी आर. टी. ची प्रक्रिया अजून सुरु झाली नाहीये. दरवर्षी पालकांना, बालकांना मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागतो आणि या वर्षी तर अधिकच उशीर झाला आहे. त्यामुळेपालकांच्या मना मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

शाळा नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रांची माहिती पालकांना देऊनआरटीईची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरुकरावी अशी मागणी चेतन बेंद्रे यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.