‘सेवा विकास’ बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांची निवड

0

पिंपरी : पिंपरी येथील दि सेवा विकास को ऑप बँक ली.च्या अध्यक्षपदी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची सभा बुधवारी (दि. 27) बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या सभेत अध्यक्षपदी ॲड. रामचंदानी यांचीएकमताने निवड करण्यात आली. सहकारी संस्था पुणे शहर तीनचे उपनिबंधक शाहूराज हिरे आणि सर्व संचालक यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. तसेच बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी देखील यावेळी उपस्थित होत्या.

ॲड. रामचंदानी हे सन 2015 पासून बँकेचे संचालक आहेत. ते वकिली, सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ॲड. रामचंदानी हे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सर्व संचालक मंडळाने व्यक्त केला. सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन ते बँकेची उत्तम प्रकारे धुरा सांभाळतील. बँकेला आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतील, असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.