तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा : राज ठाकरे

0

औरंगाबाद : तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावलीच पाहिजे. विनंती करून तुम्हाला कळत नसेल, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला औरंगाबाद येथील सभेत पुन्हा दिला.

औरंगाबादमधील जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही, तो सामजिक विषय आहे. लाउडस्पीकर या विषयाला धार्मिक वळण देणार असाल, तर त्याचं उत्तरही आम्हाला धर्मानेच द्यावे लागेल, हेही लक्षात ठेवा. आमची इच्छा नसतानाही आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्राची शांतता आम्हाला बिघडवायची नाही. आमची तशी इच्छा आणि गरजही नाही. पण, उत्तरप्रदेशातील भोंगे उतरवले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील भोंगे का उतरवले जाऊ शकत नाहीत, असा सवालही राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.

सर्वच लाउडस्पीकर हे अनधिकृत आहेत. राज्यातील किती मशिदींकडे लाउडस्पीकसंदर्भात स्थानिक पोलिसांची परवानगी आहे. औरंगाबादमध्ये सहाशे मशिदी आहेत. येथे काय बांगेची स्पर्धा चालते का. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत. प्रत्येक वेळी आम्हीच का भोगायचे. आम्हाला सभा घ्यायची म्हटले की नियम सांगितले जातात. पण, त्यांना काय नियम आहेत का नाहीत. तुम्ही रस्त्यावर येऊन नमाज पडता, हे अधिकार तुम्हाला कोणी दिले? असेही राज ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा दाखला काहीजण सध्या देत आहेत. पण सभेच्या वेळी हे बांग देणार असतील, त्यांना बंद करायला सांगावे. हे सांगून ऐकणार नसतील, तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, ते मला माहिती नाही. ते सरळ सांगून ऐकत नसतील, तर एकदा होऊन जाऊद्याच. सगळ्या धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले पाहिजेत. पण, अगोदर मशिदीवरील भोंग उतरवा आणि मगच मंदिरावरील भोंगे काढा, त्यामुळे ‘अभी नही; तो कभी नाही,’ अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी यावेळी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.