नवी दिल्ली ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वानी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजन यांनीदेखील करोन प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केली आहे. मोफत लस देणाऱ्यांच्या यादीत केरळ हे तिसरे राज्य ठेरलेले आहे.
ऑक्टोबर महिन्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वानी यांनी करोनाची लस मोफत दिली जाणार अशी घोषणा केली होती. नंतर, मध्यप्रदेश सरकारकडूनही अशीच ऑक्टोबर महिन्यात केलेली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटरद्वारे ही घोषणी केली होती.
करोना लस नजरेच्या टप्प्यात आली आहे. जगात आतापर्यंत ६ कोटी लोकांना करोनाची लागण झाली आहे. १५ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. जानेवारीपर्यंत २ लसी तर, एप्रिलपर्यंत ४ लसी उपलब्ध होण्याची सरकारला अपेक्षा आहे.