नवी दिल्ली : डेल्टा प्लस कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याचे यावर उपचार करण्यासाठी कोणते औषध प्रभावी ठरणार याचा शोध डॉक्टर घेत आहेत. नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मात्र दोन वेगवेगळ्या कोरोना लशी डेल्टा प्लसला टक्कर देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, डेल्टा प्लस आणि डेल्टासारख्या जास्त संसर्गजन्य आजाराशी दोन वेगवेगळ्या कोरोना लशी एकत्र करून लढणं शक्य आहे. पण दोन कोरोना लशी एकत्र देण्यासाठी अधिक डेटाची गरज आहे.
पर्याय म्हणून दोन कोरोना वेगवेगळ्या कोरोना लशी देता येऊ शकतात. पण चांगल्या परिणामासाठी कोणत्या दोन कोराना लशी द्यायला हव्यात याचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. यामुळे कोरोना लशीचा प्रभाव वाढेल.
देशासह राज्यात सध्या डेल्टा प्लस चे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने अनलॉकच्या नियमावलीत बदल केले आहेत. निर्बंध अधिक कडक केले आहेत. तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.