मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत आज विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतांची दमछाक झालेली पाहायला मिळाली.
शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधीपक्ष नेते अजित पवारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावतांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर अजित पवार यांनी पालघरमध्ये आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा वर किती निधी आहे किती निधीचा वापर झाला, याची माहिती द्या, असा प्रश्न केला. त्यावर मात्र, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देणे जमले नाही.