पुणे : दरवर्षी बारामतीत दिवाळीचा वेगळा उत्साह पहायला मिळतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी शुभेच्छा स्विकारल्या. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. अजित पवार यावेळी नसल्याने लगेच याची वेगवेगळी चर्चा सुरु झाली.
या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित नसल्याने ते का आले नाहीत, याची लगेच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली.
मात्र, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे. अजित पवारांच्या स्टाफ मधील ड्रायव्हरसह 4 लोक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच अजित पवारांना देखील कोरोना सदृश्य लक्षण असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यांची टेस्ट झाली असून रिपोर्ट येणे बाकी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे रिस्क नको म्हणून येऊ नका असं अजित दादांना सुचवलं असं शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.