महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील नवीन सर्किट हाऊस येथे सुरू झाली आहे . या बैठकीसाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पुढाकार घेतला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमदार अण्णा बनसोडे , शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , माजी आमदार विलास लांडे , माजी विरोधी पक्षनेते नाना काटे , माजी महापौर योगेश बहल , भाऊसाहेब भोईर , मंगला कदम , प्रशांत शितोळे , मयूर कलाटे , वैशाली काळभोर , संजय वाबळे , पंकज भालेकर , श्याम लांडे यांच्यासह नगरसेवक , नगरसेविका व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थित बैठक होत आहे .

या बैठकीत महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आखली जाणार आहे . तसेच महापालिकेत चाललेला भ्रष्टाचार, पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप , पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन , इतर पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश , प्रभाग रचना कशी असावी , पक्षसंघटनेत कोणकोणते बदल अपेक्षित आहेत अशा अनेक कामांचा आढावा खुद्द अजितदादा पवार घेत असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार , अध्यक्ष , नगरसेवक यांच्यासह पदाधिकाऱ्यांना कोणटी रणनिती आखत आहे अशी चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.