मुंबई ः महाविकास आघाडीच्या सरकराच्या भवितव्यावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात होती. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज ‘सामना’तून लिहिलेल्या लेखामधून अजित पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले आहे की, ”अजित पवार यांच्यावर लक्षा ठेवा, असं अलिकडे सातत्याने सांगितले जात आहे. पण, आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत.” भाजपाकडून महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संशय घेतला जात आहे. सामनातील लेखातून हा संशय दूर सारण्याचा प्रयत्न खासदार राऊत यांनी केला आहे.
मागील वर्षी अजित पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत कुटुंब फुटल्याचं सांगितलं होतं. अशात राजकारणात अजित पवार यांच्यावर शंका घेतली जात होती. मात्र, राष्ट्रावादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे अजित पवारांनी माघार घ्यावी लागली होती. नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले.