‘थोडं बारीक व्हा’ पोलीस उपायुक्तांना अजित पवारांनी भरकार्यक्रमात सुनावले

0

पिंपरी : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यक्रमादरम्यान फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोरच पोलीस उपायुक्तांना ‘थोडं बारीक व्हा’ असा सल्ला दिला आहे.

कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या हस्ते फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक चावी देण्यात येत होते. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिका अधिकारी उपस्थित होते. तेव्हा पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधीक चावी स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी अजित पवारांनी चावी देताना त्यांच्याकडे पाहून सर्वांसमोरच ‘जरा बारीक व्हा’ असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, त्यानंतर डीसीपी काकासाहेब डोळे चावी घेऊन स्टेजवरुन खाली उतरल्यानंतर अजित पवार यासंबंधी पोलीस आयुक्त शिंदे यांच्यासोबत या विषयावर चर्चा करत होते. पोलिसांनी तंदरुस्त राहावं यासाठी आपण आर आर पाटलांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ता सुरु केला असं पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.