पंतप्रधान उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरूनच अजित पवार यांनी साधला निशाणा

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची ही भूमी आहे, राष्ट्रमाता जिजाऊंची ही भूमी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भर व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. 12 वर्षांपूर्वी मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, पण काही लोकांच्या हट्टामुळे हा प्रकल्प एलिव्हेटेड करावी की अंडर ग्राऊंड यात अनेक वर्षे गेली. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे.

मेट्रोच्या विस्तारित मार्गांच्या कामासाठी केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी करत नागपूर मेट्रो वेगाने पूर्ण झाली. त्याच पद्धतीने पुणे तसंच इतर मेट्रो प्रकल्प पूर्ण व्हावेत. आम्ही त्यात राजकारण आणणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.