देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून विरोधी पक्षाकडून टीका सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.“

Leave A Reply

Your email address will not be published.