अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यांनतर स्वतः भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांची चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांची CBI मार्फत चौकशी करण्यासाठीचे पत्र थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अजित पवार व अनिल परब यांची CBI चौकशीची मागणी केली आहे. पण, आम्ही अशा चौकश्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे मलिक म्हणाले, ‘राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केलीय. आता भाजप पक्षाचे नेते ठरणार का? कोणाची चौकशी करायची, कुणाला दोषी ठरवायचे. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही. आम्ही घाबरत नाही, भाजपचे काही नेते अडचणीत येणार आहे.
म्हणून भाजपकडून अशी मागणी केली जात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची CBI मार्फत सखोल चौकशी करावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं या पत्रातून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, प्रदेश भाजपच्या 1 कोटी 10 लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.