मंत्रिमंडळात अजित पवार यांची ‘एन्ट्री’ पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली
पिंपरी : राज्यातील राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांची मंत्रिमंडळात ‘एंट्री‘ होताच पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल झालेआहेत. पिंपरी–चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्तआयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची वर्णी लागली आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून वाघ यांची २१ सप्टेंबर २०२१ रोजी पिंपरी महापालिकेच्याअतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. प्रतिनियुक्तीवरील त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी–छापवाले यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारीसंवर्गातील अधिकारी विजयकुमार खोराटे यांची पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावर प्रतिनियुक्तीने बदलीचे आदेशकाढण्यात आले आहेत.
या आदेशात जितेंद्र वाघ यांची पिंपरी महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून त्यांची सेवा मूळ महसूल व वन विभागातवर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सत्तेतील बदल आणि राजकीय स्थित्यतरांचा पहिला फटका वाघ यांना बसल्याचे याबदलीमुळे समोर आले आहे. पुढच्या काळात आणखी कोणाची बदली होणार, हे पाहावे लागणार आहे.