पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग केली. राजकीय मैदानात सडेतोड टोलेबाजी करण्यात माहिर असणाऱ्या अजित पवारांनी घरच्या मैदानावर बॅट हाती घेऊन जोरदार फटकेबाजी केली.
बारामती शहरात ते क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. सामान्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना बॅटिंग करण्याचा आग्रह केला. आणि मग काय उपमुख्यमंत्र्यांनी हातात बॅट घेतली आणि जोरदार टोलेबाजी केली.
अजित पवार खुद्द मैदानात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना बॅटिंग करण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे त्यांनीही बॅट हातात घेतली. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने एकच घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मोठ्या उत्साहाने आलेला चेंडू चांगलाच टोलावला.