पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिपरी चिंचवड या ठिकाणी जन्मदिनाच्या शुभेच्छांचे होर्डिंग लावले आहे. पण होर्डिंग न लावण्याचे आवाहन राष्ट्रवादीने केलंय. तरीही पुणे आणि पिपरी चिंचवड या ठिकाणी होर्डिंग दिसत आहे. यावरून अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘होर्डिंग लावण्यास मी सांगितले नव्हते. गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष. आम्ही आवाहन करण्याचे काम केले होते. त्यामुळे कुणी चुकीचं काम केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कशाची बंदी नाही. असं अजित पवार म्हणाले. यावेळी पवार हे माध्यमांशी बोलत होते.
पुढे अजित पवार यांनी होर्डिंगच्या मुद्यावरून बोलताना म्हणाले की, ‘मी अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येतोय. त्यामुळे येथील नागरिकांना माझी मतं स्पष्टपणे माहिती आहेत. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. मी नियमाचा पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील, तर भाजपची येथे सत्ता आहे. भाजपने कारवाई करावी. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे. या वाढदिवशी निमित्त पुणे आणि पिंपरी शहरात भाजप आणि राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आली होती. आहे. तर आगामी पुणे महापालिकेची निवडणूक असल्याने जोरदार बॅनरबाजी केलीय. तसेच अजित पवार यांच्या वाढदिवसाचे मोहीम चालविण्यात आले. त्याची टॅगलाईन ”कारभारी लय भारी” अशी देण्यात आली होती, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग मोहीम ”नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार’ असं देण्यात आलं होतं.