मुंबई : ”वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली का?”, असे ट्विट करून भाजपाचे निलेश राणे यांनीअजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळेलेल्या यशावर अजित पवार म्हणाले होते की, ”अमरावतीची जागा मिळाली असती, तर समाधान असतं. नागपूर आमि पुण्यातील एका पक्षाची जी मक्तेदारी होती, ती मोडीत निघाली. आता सुशिक्षित वर्गदेखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. हे सिद्ध झालं.”
अजित पवार भाजपावर टीका करताना असेही म्हणाले होते की, ”बरेच जण वाचाळ बडबड करत होते. त्यांची नावं घेऊन वेळ घालवू इच्छित नाही. मात्र, हा निकाल त्या वाचाळविरांनी बसलेली जबरदस्त चपराक आहे. लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, हे स्पष्ट झालं आहे.”