पिंपरी : संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई , चोखामेळा ,संत रोहिदास महाराज यांनी रूढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा यातून जनतेला मुक्तीचा मार्ग दिला हे विश्वची माझे घर ऐसी मति जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जहाला असा विश्वाला शांतीचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, महाराष्ट्रात संतांची मोठी परंपरा आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्र हा अंधश्रद्धा मधून बाहेर पडून पुरोगामी म्हणून ओळखला जातो,
आळंदीस संतांची भूमी आहे संताच्या या पावन भूमीतून समाज परिवर्तनाची लढाई लढण्याची प्रेरणा मिळते यामुळे या देशातील शोषित कष्टकरी बहुजन वर्गांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा घेऊन हा लढा पुढील काळामध्ये व्यापक करू असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड ,आणि टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनांच्या वतीने आळंदी येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.यावेळी आळंदी शहराचे माजी नगराध्यक्ष डी. डी. भोसले पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आळंदी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुराडे, आळंदी वाहतूक शाखेचे साहेब सह्य पोलीस निरीक्षक, अनिल रिबिके प्रल्हाद कांबळे ,बळीराम काकडे हिला आघाडीच्या नेत्या आशा कांबळे, अनिता सावळे ,गौरी शेलार ,जयश्री एडके, मधुरा डांगे, रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, हिरामन गवारे आदी उपस्थित होते.
मोशी ते देहु संत कृपा रिक्षा संघटना मिलिंद गगवाने यांनी पदाधिकारी सोबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत मदे प्रवेश करत त्यांची संघटना पंचायत सलग्न जाहिर केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल रिबिके यांनी रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे तसेच नियमितपणे खाकी ड्रेस घातला पाहिजे असे म्हणत खाकी घालण्याचा मान पोलिसांना नंतर रिक्षाचालकांना मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू नका खाकी ड्रेस घातल्यास तुम्ही शोभून दिसतात ,नागरिकांशी सौजन्याने वागा भाडे नाकरू नका अशा प्रकारे मार्गदर्शन केले.