आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

0

पिंपरी : आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रियंका अभिषेक उमरगेकर (वय अंदाजे 22) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. प्रियंका उमरगेकर या आळंदीच्या भाजपच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सूनबाई होत्या.  चारच महिन्यांपूर्वी प्रियंका यांचे लग्न झाले होते.

आळंदी पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  प्रियंका उमरगेकर यांनी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्या रहिवाशांनी पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.