अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

0

पिंपरी : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूकीत आज (शुक्रवारी) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर त्यांनी अर्ज माघार यावा यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे, अपक्ष म्हणून राहूल कलाटे यांच्यासह 33 उमेदवार रिंगणात आहेत. या 33 उमेदवारांमध्ये दोन राष्ट्रीयकृत पक्षाचे, 5 नोंदणीकृत पक्षाचे तर 26 अपक्षांचा समावेश आहे. बुधवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरूवार आणि शुक्रवार अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. गुरूवारी सकाळी 10 ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. या वेळेत एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांची बंडखोरी शमविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. माघार घेण्याची विनंती त्यांना केली जात आहे. परंतु, जनभावनेचा अनादर मी करणार नाही. आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे कलाटे यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे नेते, पुण्याचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची आज भेट घेणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अहिर यांच्या भेटीत कलाटे यांचे समाधान होईल का, कलाटे माघार घेतील का, निवडणूक लढण्यावर ठाम राहतील, याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.