पिंपरी : मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो हाटविण्यासाठी आज तळेगाव दाभाडे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी जन आक्रोस केला. लिंबफाटा तळेगाव येथून नागरिकांचा भलामोठा जथ्था सोमाटणे टोलनाक्याकडे निघाला होता. खिंडी दरम्यान पोलीस पथकाने हा ताफा आडवत आंदोलन स्थगिती करण्याची विनंती केल्यामुळे सदरचा मोर्चा टोलनाक्यावर न जाता मध्येच त्याचे सभेत रुपांतर झाले. या सभेत सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका विषद करत हा टोलनाका कसा बेकायदेशीर आहे हे सांगितले. तसेच 10 मे पर्यत टोलनाका बंद न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळातील नागरिकांना सोमाटणे व वरसोली येथील टोलनाक्यावर टोल न भरण्याचे आवाहन केले आहे.
टोलचा झोल दर्शविणारचया गाण्याच्या ध्वनीफितीतून वातावरण चांगले ढवळून निघाले होते. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चातील नागरिकांचा उत्साह वाखण्या सारखा होता. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अंदोलनात राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोमाटणेतील हा बेकायदेशीर टोल आहे. दोन टोल मधील अंतर 29 किलोमीटर आहे. ही टोलधाड आम्ही गेली वीस वर्षे सहन करतोय, आता सहन करणारा नाही. मावळच्या जनतेची फसवणूक करणा-या टोल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.